Join us
Daily Top 2Weekly Top 5

इराण-इस्रायल युद्धाचा फटका आता आरोग्यसेवेला; कतारमधून 'हेलियम'चा पुरवठा विस्कळीत, 'या' चाचण्या महागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 12:39 IST

Helium Crisis News : पश्चिम आशियामध्ये इराण आणि इस्रायल-अमेरिका आघाडी यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता भारताच्या आरोग्य क्षेत्रावरही जाणवू लागला आहे.

Helium Crisis News : पश्चिम आशियातील इराण आणि इस्रायलमधील युद्धाचे पडसाद आता केवळ इंधन बाजारापुरते मर्यादित राहिले नसून, त्याचा थेट परिणाम भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर होण्याची चिन्हे आहेत. कतारमधून येणाऱ्या 'हेलियम' वायूचा पुरवठा खंडित झाल्यामुळे भारतातील एमआरआय सारख्या गंभीर वैद्यकीय चाचण्या महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एमआरआय मशीनमधील शक्तिशाली चुंबकांना थंड ठेवण्यासाठी हेलियम हा अत्यंत आवश्यक घटक मानला जातो.

कतारमधील 'रास लाफान' प्रकल्पावर ड्रोन हल्ला

  • भारत आपल्या हेलियम गरजेसाठी मोठ्या प्रमाणावर कतारवर अवलंबून आहे. कतार हा जगातील हेलियम पुरवठ्याचा जवळपास एक तृतीयांश हिस्सा पुरवतो.
  • पुरवठा साखळी विस्कळीत : इराणने कतारमधील जगातील सर्वात मोठ्या एलएनजी प्रकल्पावर, म्हणजेच 'रास लाफान' वर केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे हेलियमच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.
  • जागतिक परिणाम : या हल्ल्यामुळे हेलियमच्या जागतिक व्यापारात सुमारे १४ टक्क्यांची कपात झाली असून, त्याचा मोठा फटका भारतीय रुग्णालयांना बसत आहे.

केवळ एमआरआय नाही, इतर उपकरणांचाही तुटवडावैद्यकीय उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांनी इशारा दिला आहे की, हेलियमसोबतच इतर काही मूलभूत वैद्यकीय वस्तूंची टंचाई पुढील महिन्यापासून जाणवू शकते. यात प्रामुख्याने,

  1. आयव्ही बॅग्स आणि यूरिन बॅग्स
  2. कॅन्यूला आणि सिरिंज
  3. इतर प्लास्टिक आधारित वैद्यकीय साधने

जर युद्धाची स्थिती अशीच कायम राहिली, तर रुग्णालयांच्या खर्चात वाढ होईल आणि पर्यायाने एमआरआय स्कॅनचे दर वाढू शकतात. काही प्रकरणांमध्ये चाचण्यांसाठी रुग्णांना जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागण्याचीही शक्यता आहे.

वाचा - हक्काच्या घरासाठी किती पगार हवा? ५० हजार ते १ लाख कमवणाऱ्यांसाठी गृहकर्जाचे A टू Z गणित

'हेलियम-फ्री' तंत्रज्ञानाचा उदय

  • या गंभीर टंचाईवर मात करण्यासाठी काही कंपन्यांनी आधुनिक पर्याय शोधले आहेत. 'ड्रायकूल' तंत्रज्ञानाचा वापर करून आता 'हेलियम-फ्री' एमआरआय मशीन विकसित केल्या जात आहेत.
  • भारतीय स्टार्टअपची झेप : बंगळुरूस्थित 'व्हॉक्सलग्रिड्स' या स्टार्टअपचे संस्थापक अर्जुन अरुणाचलम यांनी सांगितले की, त्यांच्या हेलियम-मुक्त सिस्टममुळे कंपनीला हेलियमच्या वाढत्या किमतींचा कोणताही फटका बसणार नाही. या तंत्रज्ञानामुळे परदेशातील आयातीवर असलेले अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. 
English
हिंदी सारांश
Web Title : Helium crisis threatens Indian healthcare due to Middle East conflict.

Web Summary : Middle East conflict disrupts helium supply, impacting Indian healthcare. MRI scans may become costlier due to shortage. Hospitals face scarcity of essential medical supplies, including IV bags. Indigenous helium-free MRI technology offers a solution.
टॅग्स :अमेरिका-इस्रायल-इराण वॉरइंधन टंचाईएलपीजी गॅस टंचाईयुद्धआरोग्य